Grah Gochar 2023: जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील, ज्याचा परिणाम अनेक राशीच्या लोकांवर होऊ शकतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. बुधाच्या या राशी बदलामुळे ‘त्रिकोण राजयोग’ तयार होईल, जो अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. बुध हा ग्रह ज्ञान, विद्या, बुद्धिमत्ता आणि तार्किक क्षमता इत्यादींचा कारक मानला जातो. चला जाणून घेऊया मकर राशीत बुध ग्रहाच्या उपस्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो.

मेष राशी

मकर राशीतील बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या कुंडलीच्या दहाव्या घरात त्रिकोण राजयोग तयार होईल. या काळात स्थानिकांना नोकरीच्या ठिकाणी यश मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधीही मिळू शकतात. सामाजिक मान- सन्मानातही वाढ होऊ शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफाही मिळू शकतो.

मकर राशी

या राशीत बुधाचे संक्रमण होणार आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशी बदल खूप फायदेशीर ठरू शकतात. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. स्थानिकांना मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्तिथीही यावेळी चांगली राहणार आहे. तुम्हाला या काळात उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण होतील.

( हे ही वाचा: १२ वर्षांनंतर गुरूदेवाचा सर्वात मोठा प्रवेश! ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, होऊ शकतो प्रचंड धनलाभ)

तूळ राशी

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध चतुर्थ भावात भ्रमण करेल. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे स्थानिकांना अनेक सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तसंच या काळात तुम्हाला प्रचंड धनलाभाची संधी देखील मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )