Grah Gochar Diwali 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, त्याला गोचर म्हणतात. या गोचरचा थेट परिणाम राशिचक्रातील अनेक राशींवर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेगवेगळ्या वेळी राशी परिवर्तन करतो. जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व बारा राशींवर पडतो.

सध्या २३ ऑक्टोबर २०२४ ला बुध ग्रहाने विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर २४ ऑक्टोबरला गुरूने स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश केला. तसेच शुक्र आणि मंगळ सुद्धा नक्षत्र परिवर्तन करणार आहे. २७ ऑक्टोबरला शुक्र ज्येष्ठामध्ये आणि २८ ऑक्टोबरला मंगळ पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. २९ ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे.त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी वरुण ग्रह नेपच्यून पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे.

ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम १२ राशींवर दिसून येईल पण ज्योतिषांच्या मते, या दरम्यान पाच राशींचे नशीब उजळणार आहे. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?

मेष राशी

या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होईन. व्यवसायात मोठा नफा मिळेल. या राशींच्या लोकांचा समाजात मानसन्मान वाढेन. गमावलेलं प्रेम पुन्हा मिळू शकते. प्रेम संबंधामध्ये समृद्धी नांदेल.

हेही वाचा : येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा

सिंह राशी

या राशीच्या लोकांसाठी हा वेळ उत्तम राहीन. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. नवी नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल. प्रेम जीवनात मोठे बदल होऊ शकतात.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. हा काळ अत्यंत शुभ राहीन. कुटुंबात सुख-शांती लाभेन. या लोकांचे धार्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकेल. या लोकांना व्यवसायात भरपूर लाभ होईल. यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

हेही वाचा : नुसता पैसाच पैसा! २०२५ मध्ये गुरू करणार तीन वेळा राशीपरिवर्तन; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे सुख

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना या दिवाळीपूर्वी प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. जोडीदाराबरोबर नातेसंबंध दृढ होईल. जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकाल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना यादरम्यान भरपूर फायदा होईल. पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकते. लक्ष्मीची कृपा दिसून येईल. घरात सुख शांती लाभेल. घरात सुख समृद्धी नांदेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)