Guru Gochar 2026: वर्ष २०२६ हे अनेक राशींसाठी भाग्याचे दार उघडणारं ठरणार आहे. ज्ञान, सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जाणारा गुरु ग्रह या वर्षी आपल्या उच्‍च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. २ जून २०२६ रोजी सकाळी गुरुचा हा महत्त्वपूर्ण गोचर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा उच्‍च राशीत प्रवेश ही अत्यंत शुभ घटना मानली जाते आणि या काळात काही राशींवर धनवर्षाव होऊन भाग्योदय होतो. या वर्षी वृषभ, मिथुन, कर्क आणि कन्‍या राशींसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येणार आहे.

सध्या गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असून ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ते वक्री होणार आहेत. त्यानंतर ते काही काळ अतिचारी स्थितीत राहतील आणि नंतर जून २०२६ मध्ये उच्‍च राशी कर्कमध्ये गोचर करतील. या परिवर्तनामुळे या चार राशींच्या जीवनात जबरदस्त बदल घडणार आहेत.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष करिअरमध्ये झपाट्याने प्रगती घडवणारं ठरेल. कामाच्या ठिकाणी सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नवे व्यावसायिक करार, बढती आणि अपेक्षित बदल मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या वर्ष अनुकूल असून बचत आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. विवाहितांचे नाते अधिक गहिरे होतील आणि अविवाहितांना विवाहाचे योग लाभतील. जूननंतर परदेश प्रवासाचे किंवा उच्च शिक्षणासाठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र आळस टाळा, नाहीतर काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतात.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचा गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. जीवनात समृद्धी, आनंद आणि प्रगतीची नवी पानं उघडतील. जुने अडकलेले आर्थिक लाभ मिळतील आणि नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल ठरेल. तुमची वाणी प्रभावी होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. शत्रू आपोआप शांत राहतील. घरात नवीन सदस्य येऊ शकतो किंवा कोणतं तरी मंगलकार्य होईल. एकूणच, गुरु तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समाधान घेऊन येतील.

कर्क राशी (Cancer)

गुरु जेव्हा आपल्या उच्‍च राशीत येतात तेव्हा त्या राशीला भाग्याचा वरदहस्त लाभतो. कर्क राशीच्या लोकांसाठी हा गोचर म्हणजे जणू लॉटरी लागल्यासारखा आहे. धनसंपत्तीमध्ये भर पडेल, संपत्तीविषयक वाद मिटतील आणि जुन्या मालमत्तेतूनही फायदा मिळेल. करिअरच्या दृष्टीने मोठ्या यशाची संधी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवी धार येईल. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळेल, विशेषत: जे परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांना मोठी संधी मिळू शकते. अध्यात्माकडे ओढ वाढेल आणि दान-पुण्याच्या कार्यातून मानसिक समाधान लाभेल. आरोग्याच्या दृष्टीनेही काळ लाभदायी आहे.

कन्‍या राशीसाठीही गुरुचा हा गोचर अत्यंत शुभदायी ठरणार आहे. आर्थिक प्रगती, संपन्नता आणि समाजातील प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि जुनी इच्छा पूर्ण होईल. उच्च पदस्थ व्यक्तींशी संपर्क येईल, ज्यातून मोठी प्रगती साधता येईल. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ असून शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसायिकांना नवीन ग्राहक मिळतील आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल.

कन्‍या राशी (Cancer)

गुरुचा हा उच्‍च राशीतील गोचर चारही राशींच्या जीवनात संपत्ती, सौख्य आणि यशाचं नवं पर्व सुरू करणार आहे. अनेकांना त्यांच्या कष्टाचं सोनं होईल असं या काळात दिसतंय. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी आणि नव्या संधींचं स्वागत करावं.