Guru – Budh Sanyog 2025 : वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट काळानंतर राशी किंवा नक्षत्रबदल करीत असतो, ज्यातून शुभ संयोग किंवा राजयोग निर्माण होत असतात. त्यांचा परिणाम सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. जूनमध्ये बुध आणि गुरू ग्रहात दुर्मीळ संयोग होणार आहे. तब्बल १२ वर्षांनी मिथुन राशीत बुध-गुरूचा संयोग होईल. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. तसेच या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. चला जाणून घेऊ या भाग्यवान राशींविषयी…

सिंह

बुध आणि गुरू ग्रहाचा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कामाचेही कौतुक होऊ शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यावसायिकांना चांगले संबंध प्रस्थापित करता येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची शक्यता आहे, तसेच यावेळी तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतात.

कन्या

बुध आणि गुरूचा संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सुखसोई वाढू शकतात, कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार वाढू शकतो. या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन

गुरू-बुधाचा दुर्मीळ संयोग मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या सुखसोईंमध्ये वाढ होऊ शकते. हा काळ वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी उत्तम आहे. तुमचे आई आणि सासू-सासऱ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. अडकलेले आर्थिक व्यवहार आता मार्गी लागू शकतात. रिअल इस्टेट, मालमत्ता, जमीन व संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो.