Gajkesari Rajyog 2025 : ज्योतिषशास्त्रात, गुरू हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो, ज्याला देवगुरू असे म्हटले जाते. जो ज्ञान, धार्मिक कार्य, शिक्षण, दान, भरभराटीचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरूच्या हालचालीतील बदलांचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. त्यात गुरूनं एका वर्षानं आता मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि आता चंद्रदेखील याच राशीत प्रवेश करील. अशा वेळी गुरू व चंद्राच्या युतीने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभासह नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते; पण कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…

ज्योतिष पंचांगानुसार, चंद्र २४ जून रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जो २७ जूनपर्यंत तिथे राहील. अशा वेळी गुरू-चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होईल आणि ज्याचा प्रभाव सुमारे ५४ तास असेल.

वृषभ

गजकेसरी राजयोग वृषभ राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकतो. या काळात वृषभ रास असलेल्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. वडिलोपार्जित व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. आयुष्यात आनंद येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ फलदायी असेल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध मजबूत होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही जास्त वेळ घालवू शकता. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे. समाजात मान वाढू शकतो.

मिथुन

गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठीही सकारात्मक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षणात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. लग्नासाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. समाजातील मोठ्या, प्रसिद्ध व्यक्तींना भेटू शकता. तुम्ही सामाजिक प्रगती करू शकता. धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आता दीर्घकाळापासून असलेला आजार बरा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ

गजकेसरी राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनुकूल परिणाम दिसून येणार आहेत. त्यांचा कल अध्यात्माकडे असू शकतो. त्यामुळे धार्मिक तीर्थयात्रा करू शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ कोणत्याही कामात मिळू शकते. तुमचे बिघडलेले काम चांगले होऊ शकते. तुम्हाला तुमच्या भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला चांगले यश मिळू शकते. संतती सुख मिळू शकते. त्यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. कामातील अडथळे दूर होऊ शकतात.