Jupiter Transit 2025 Negative Zodiac Impact: आता काही दिवसांवर धनत्रयोदशी येत आहे आणि त्याच दिवशी एक महत्त्वाचा ग्रह बदल होणार आहे. १८ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी देवगुरु बृहस्पति कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. हा गोचर काही राशींसाठी शुभ मानला जात असला, तरी दोन राशींच्या लोकांसाठी तो थोडासा आव्हानात्मक ठरू शकतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

गुरु हे ज्ञान, धर्म, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. मात्र, ते जेव्हा राशी बदलतात तेव्हा काही राशींवर मानसिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. या वेळी गुरु कर्क राशीत प्रवेश करून ५ डिसेंबर दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत तेथे राहतील. या काळात कोणत्या राशींना सावध राहण्याची आवश्यकता आहे पाहूयात.

१८ ऑक्टोबरला गुरूचा गोचर; ‘या’ दोन राशींनी राहावे सावध!

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा हा गोचर कन्या राशीच्या आठव्या भावात होत आहे. हा भाव गुप्त धन, अचानक बदल आणि जीवनातील रहस्यांशी जोडलेला असतो, त्यामुळे या काळात कन्या राशीच्या लोकांना काही अनपेक्षित बदलांचा सामना करावा लागू शकतो. धनत्रयोदशीपासून पुढील काही आठवड्यांत धनसंबंधी व्यवहारांमध्ये विशेष काळजी घ्यावी असं सुचवलं जातं. मोठा गुंतवणूक निर्णय किंवा विमासंबंधी व्यवहार पुढे ढकलणं चांगलं. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान, करिअरमधील अनिश्चितता आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक

गुरुचा गोचर वृश्चिक राशीच्या सहाव्या भावात होत आहे. हा भाव आरोग्य, दिनचर्या आणि कामकाजाशी संबंधित असतो, त्यामुळे या काळात आरोग्याच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी लागेल. जुन्या आजारांनी त्रास होण्याची शक्यता असल्याने जीवनशैली आणि आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरेल. कामाच्या ठिकाणी काही अडथळे किंवा थकवा जाणवू शकतो. आर्थिक परिस्थितीदेखील डळमळीत होईल. कार्यक्षेत्रात अडथळे आणि कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागू शकतो. विवाहित लोकांच्या जीवनात तणाव निर्माण होण्याची भीती आहे. यावेळी लपलेले शत्रू तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

ज्योतिषशास्त्र सांगते की, ग्रहांचे हे बदल जीवनात काही शिकवण देण्यासाठीच येतात, म्हणूनच हा काळ भयाचा नाही तर सजग राहून स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)