Dainik Rashi Bhavishya in Marathi, 13 June 2025 : १३ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत शुक्ल योग जुळून येईल. संध्याकाळी ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज रात्री ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत गुरु आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
१३ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Horoscope Today in Marathi, 13 June 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर