Guru Gochar in Vrishabha Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. देवांचा गुरू बृहस्पति सध्या स्वतःच्या राशीत मेष राशीत आहे. गुरू १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. देवगुरु तब्बल १२ वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करत आहेत. गुरु वर्षभर या राशीत राहील. त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत; या भाग्यशाली राशी…

‘या’ राशी होणार मालामाल?

वृषभ राशी

देव गुरुचे गोचर वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरु शकते, कारण गुरु वृषभ राशीमध्येच प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या काळात पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

(हे ही वाचा : ३० वर्षांनी गुढीपाडव्याला ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? नववर्षात शनिदेव देऊ शकतात अपार श्रीमंती)

कर्क राशी

गुरुच्या राशी परिवर्तनाचा लाभ कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकते. या काळात प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. कामात आणि योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी

देवगुरुचे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. गुरूच्या कृपेनं जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी देखील चालून येऊ शकते. या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळं या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.