Lucky zodiac signs on Dhanteras: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. पंचांगानुसार, १८ मे रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातूनही खूप खास मानला जाणार आहे. या दिवशी देवगुरू बृहस्पति राशी परिवर्तन करणार आहे. सध्या गुरू मिथुन राशीत विराजमान असून धनत्रयोदशीच्या दिवशी देवगुरू कर्क राशीत गोचर करेल. देवगुरूच्या कर्क राशीतील गोचराचा मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशीत तो ४ डिसेंबर २०२५ पर्यंत विराजमान राहील.
‘या’ दोन राशींचे भाग्य पदोपदी मिळवणार यश
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. शत्रुंवर विजय मिळवाल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे हे गोचर खूप फायदेशीर असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक मनोकामना पूर्ण कराल. त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)