Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राशीबदल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरत असतो. यात ग्रहांचा राजा सूर्यदेव मेष राशीत आहे, जो दोन दिवसांनी राशी बदल करणार आहे. १४ मे रोजी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल, सूर्य १४ मे रोजी सायंकाळी ६:०५ वाजता सूर्य वृषभ राशीत (प्रवेश करेल आणि पुढील ३० दिवस या राशीत राहील. यानंतर १५ जून रोजी दुपारी १२.३७ वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल. सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या लोकांच्या नशिबाला कलाटणी देणारे असू शकते, ज्यामुळे त्यांचे भाग्य उजळू शकते. काही लोकांच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा प्रभाव पडेल. सूर्यदेव १४ जूनपर्यंत शुक्राच्या राशीत राहील; अशा परिस्थितीत सूर्याच्या संक्रमणाने काही राशींसाठी चांगला काळ सुरू होईल. चला तर मग सूर्याचे हे राशी संक्रमण कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते जाणून घेऊ…

मेष

सूर्याचे वृषभ राशीतील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांंना कामावर केंद्रित करता येईल, ज्यामुळे त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्ही हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत घ्याल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवता येईल, यामुळे तुमचे प्रेमाचे नाते किंवा वैवाहिक जीवन सुखात व आनंदी असू शकते.

Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
Influence of Saturn and Mars the fortunes of these three zodiac signs
नवी नोकरी, भरपूर पैसा; शनी-मंगळाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Transit of Venus in Cancer in July
देवी लक्ष्मीची होणार कृपा! जुलै महिन्यात कर्क राशीत शुक्राचे राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख
Never Ignore These Changes In Your Mole On Skin Priyanka Chopra Brother in Law Kevin Jonas Skin Cancer
प्रियांका चोप्राच्या दिराला त्वचेचा कर्करोग; तीळ व चामखिळाच्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, पाहा लक्षणे
golden age of these zodiac signs
येत्या २ दिवसात सुरू होईल ‘या’ राशींचा सुवर्णकाळ, सूर्यासारखे उजळेल नशीब!
The persons of these four zodiac signs will get money prosperity and pleasures of wealth
६ जुलैपर्यंत शुक्राचा प्रभाव! ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, समृद्धी व ऐश्वर्याचे सुख
Shani Transit will bring wealth to the persons of these three zodiac signs
२६८ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनीची चाल करणार ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल
vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा

येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ

सिंह

सूर्याचा राशी बदल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर होत तुमचा मान सन्मान वाढेल. सहकार्यांकडूनही तुम्हाला सहकार्य लाभू शकते. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमचे वडील आणि गुरु यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. धार्मिक कार्यांमधील तुमचा रस वाढू शकतो. यासह कुटुंबात सुख-शांती नांदेल, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी संक्रमण शुभ ठरू शकते. या काळात तुमचे आरोग्य सुधारू शकते. व्यवसायात येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील. तुमच्या प्रतिभेच्या जोरावर तुम्ही सर्व अडचणींवर सहज मात कराल, यामुळे समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. तुम्हाला काही चांगली बातमीदेखील मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो.