Hans Mahapurush Rajyog 2025: या वर्षीची दिवाळी केवळ दिवे, फटाके आणि आनंदाचा उत्सव नाही तर १०० वर्षांनंतर घडणारा एक दुर्मीळ ज्योतिषीय संयोग घेऊन येत आहे. येत्या २० ऑक्टोबरला म्हणजेच कार्तिक कृष्ण अमावास्येला, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर ‘हंस महापुरुष राजयोग’ निर्माण होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. वैदिक पंचांगानुसार, १८ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पती स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. या हालचालीमुळेच हा शक्तिशाली राजयोग तयार होणार आहे, जो की एका शतकानंतर पुन्हा घडतो आहे.

ज्योतिषशास्त्रात ‘हंस महापुरुष राजयोग’ हा अतिशय शुभ आणि भाग्यवर्धक योग मानला जातो. या योगाच्या प्रभावाखाली येणाऱ्या राशींच्या व्यक्तींना धन, प्रतिष्ठा, मान-सन्मान, करिअरमध्ये प्रगती आणि मानसिक समाधान लाभतं असं मानलं जातं. चला तर पाहूया, या दिवाळीला नेमक्या कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे.

कर्क

हंस महापुरुष राजयोग हा कर्क राशीच्या लग्नभावात निर्माण होतो आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रगतीची अनेक दारे उघडताना दिसतील. नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, घरगुती जबाबदाऱ्यांत कुटुंबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि आरोग्यातही सुधारणा दिसून येईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

तूळ

या राशीच्या दहाव्या भावात हंस महापुरुष योग निर्माण होत आहे. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक क्षेत्रात मोठा बदल दिसू शकतो. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत बढती, पगारवाढ किंवा नवीन ऑफर मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ नफा देणारा ठरण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन लोकांशी ओळखी लाभदायी ठरतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या नवव्या भावात हा योग निर्माण होत असल्याने, भाग्याचा हातभर आधार मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक, समाजात मान-सन्मान, या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे संकेतही ज्योतिषशास्त्र देत आहे.

या दिवाळीला नुसती दिव्यांची रोषणाई नव्हे, तर काही राशींसाठी नशिबाचं दार खुलं होणार आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)