Horoscope Today In Marathi 18 October 2025 : आज १८ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असणार आहे. आज शुक्ल योग जुळून येईल आणि मघा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत सुरु होईल ते १२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वजण आपल्या घरी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात. तर धनत्रयोदशी कोणत्या राशीच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार जाणून घेऊयात…

१८ ऑक्टोबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 18 October 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर