scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, रविवार १५ जानेवारी २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ.

Astro new
राशीभविष्य २५ जानेवारी, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 15 January 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.

Thursday 22nd February Horoscope Marathi
गुरुवार २२ फेब्रुवारी : गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भरभराटीचा; कोणाच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, पाहा…
grah gochar march 2024
मार्च महिन्यात ग्रहांचे होणार महागोचर! ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल! नोकरी-व्यवसायात मिळेल यश
Mars Mercury Venus Saturn conjunction will make in kumbh these zodiac will be lucky Mangal Shukra Shani Yuti
३० वर्षांनंतर शनी, मंगळ अन् शुक्राचा अद्भुत संयोग; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ?
Rajyog In Kundli
२०० वर्षांनी शशसह ३ राजयोग जुळून आल्याने मार्चमध्ये ‘या’ राशींचे गरिबीचे दिवस संपणार? शनिच्या कृपेने हातात येऊ शकतो पैसा

वृषभ:-

आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.

मिथुन:-

नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो.

कर्क:-

अधिकाराचा अतिवापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह:-

कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

कन्या:-

कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.

तूळ:-

इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.

वृश्चिक:-

लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.

धनू:-

दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

मकर:-

जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अतिविश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.

कुंभ:-

फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.

मीन:-

कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope 15 january 2023 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 14-01-2023 at 19:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×