Mercury planet transit: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. सध्या बुध मेष राशीत असून, २१ ते २४ मे या काळात बुध युवावस्थेत असेल; ज्यामुळे बुधाचा प्रभाव अधिक वाढेल. तसेच ३१ मे रोजी बुध शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करील; परंतु याआधी बुधाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर अधिक पाहायला मिळेल. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.

वृषभ

बुध ग्रहाचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

मिथुन

बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींवरही बुधाचा प्रभाव राहून, सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.

कन्या

कन्या राशीचा स्वामीदेखील बुध ग्रह आहे. त्यामुळे बुधाच्या प्रभाव राहून, तीन दिवस तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा: १३५ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनि वक्री होताच ‘या’ तीन राशींसाठी सुरु होणार भरभराटीचे दिवस

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही बुधाच्या प्रभावामुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)