आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक वाद संयमाने सोडवा. कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

महत्त्वाकांक्षेच्या जोरावर दिवस चांगला जाईल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. अधिकारात वाढ होण्याची शक्यता. हातातील कामात यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

वृषभ:-

कामाच्या ठिकाणी मतभेदाची शक्यता. कौशल्याने विजय मिळवाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा. कठोरपणे वागू नका. ज्ञानात भर पडेल.

मिथुन:-

सरकारी कामे वेळ वाया घालवू शकतात. व्यवसायिकांना नाविण्याची जाणीव होईल. नातेवाईकांसोबत पैशाचे व्यवहार टाळा. जास्त धावपळीमुळे थकवा जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कर्क:-

व्यवसायात भागीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कामात रस घ्याल. नोकरदारांची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिक श्रम घ्यावे लागतील. रागामुळे तुमची प्रतिमा बिघडू शकते.

सिंह:-

दिवस संमिश्र फलदायी राहील. सामाजिक मान वाढेल. पदोन्नती साठी प्रयत्न करत रहा. जमिनीसंबंधी व्यवहारात काटेकोर लक्ष द्या. आईशी मतभेद होण्याची शक्यता.

कन्या:-

दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात रूजेल. नोकरदारांच्या जबाबदार्‍या वाढतील. व्यवसायात भागभांडवळापासून दूर राहावे. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.

तूळ:-

सांसारिक सुखात वाढ होईल. तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृश्चिक:-

दिवस परोपकारात घालवाल. इतरांना मदत केल्याचे समाधान मिळवाल. सहकारीवर्ग तुमच्यावर नाराज होऊ शकतो. व्यावसायिक बजेटची चिंता सतावेल. देव दर्शनाचा लाभ उठवाल.

धनू:-

मित्रांची मतभेद होऊ शकतात. संयमी वागणे ठेवावे. सौम्य वागण्याने वातावरणातील ताण दूर करता येईल. महिला नवीन खरेदी करतील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल.

मकर:-

अचानक धनलाभाची शक्यता. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे काम करताना ताण येण्याची शक्यता. मैत्रीत फार सहभाग दर्शवू नका. नोकरदारांनी उत्पन्नाचा मेल घालावा.

कुंभ:-

मुलांच्या यशाचा आनंद घ्याल. हातात मोठी रक्कम आल्याने समाधान मिळेल. तुमची प्रगती स्पष्टपणे दिसून येईल. जोडीदाराकडून भेट मिळेल. इतरांना प्रभावित करण्यात वेळ घालवाल.

मीन:-

प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. कौटुंबिक वाद संयमाने सोडवा. कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. भागीदारी फायदेशीर ठरेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 26 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr