Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today’s Horoscope in Marathi 29 June 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २९ जून २०२५
मंगळ-शनी देणार पैसाच पैसा; 'या' तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पदोपदी यश
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.
सूर्याचा अंक, सोन्यासारखं नशिब! या दिवशी जन्मलेल्यांवर असतो श्रीमंतीचा वर्षाव, मिळते अपार धन अन् पैसा
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल.
शुक्राचं गोचर उडवणार 'या' तीन राशींची झोप; वाढणार खर्च अन् लागणार आर्थिक झटका!
Aajche Rashi Bhavishya: कोणाच्या नशिबात हौस मौज तर कोणाच्या नशिबात कष्ट; वाचा मेष ते मीनचे सुट्टी विशेष राशीभविष्य
<span style="font-family: inherit;font-size: 1.125rem">तुमच्या भाग्यात काय लिहिलंयं जाणून घ्या... (Photo: Freepik)</span>