Gajkesari Yoga 2025 impact in marathi: २०२५ सालचा १२ ऑक्टोबर हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ आणि ऐतिहासिक मानला जात आहे. कारण- या दिवशी गुरू आणि चंद्र यांचा एकत्र योग येत असून, त्यामुळे अत्यंत प्रभावी असा गजकेसरी योग निर्माण होणार आहे. हा योग तयार होतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात सुख, संपत्ती, कीर्ती व स्थैर्य यांचा वर्षाव होतो, असं मानलं जातं.
काय आहे गजकेसरी योग?
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्रमा आणि गुरू एका राशीत एकत्र येतात, तेव्हा त्या संयोगाला ‘गजकेसरी योग’ म्हटलं जातं. ‘गज’ म्हणजे हत्ती आणि ‘केसरी’ म्हणजे सिंह म्हणजेच या योगाचा अर्थ सामर्थ्य, प्रतिष्ठा व बुद्धिमत्ता यांचा संगम, असा होतो. या दिवशी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून, गुरू आधीपासूनच तेथे स्थित आहे. त्यामुळे मिथुन राशीत हा शक्तिशाली गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या योगाचा लाभ विशेषतः तीन राशींच्या लोकांना होणार आहे. या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ सोन्याचा ठरणार आहे. चला पाहूया, या राशींवर काय परिणाम होणार आहेत…
मिथुन (Gemini)
गजकेसरी योग या राशीच्या लोकांसाठी अत्यंत कल्याणकारी ठरणार आहे. दानधर्म आणि पुण्यकर्म करणाऱ्यांना त्याचे विशेष फळ मिळू शकते. मुलांच्या आयुष्यातील अडथळे कमी होतील आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पैशांच्या बाबतीत मोठा दिलासा मिळेल. बचतीच्या योजना यशस्वी होतील आणि बँक-बॅलन्स वाढताना दिसून येऊ शकतो. ज्यांना काही गुपित उघड होण्याची भीती होती, त्यांची ती काळजी संपुष्टात येईल. कामात उन्नती, सन्मान व मनःशांती या सर्वांचा संगम अनुभवायला मिळेल.
तूळ (Libra)
गजकेसरी योग तूळ राशीसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात मोठे निर्णय घेताना यश मिळेल. जुन्या मित्रांसोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ भरभराटीचा आहे. व्यवहार वाढतील, नवे संपर्क लाभदायी ठरतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमरातब वाढेल. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात. आयवाढ होईल आणि घरातील आजारी वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येऊ शकते.
धनू (Sagittarius)
या योगाचा धनू राशीच्या लोकांना सर्वाधिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीतून शुभ बातमी येऊ शकते. व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. बुद्धीचा योग्य वापर करून मोठा नफा मिळू शकतो. व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होतील, नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि कामाचा विस्तार होईल. विवाहयोग जुळू शकतो, वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. काही जण तर या काळात हिल स्टेशनवर सहलीचा आनंद लुटण्याचीही योजना आखतील.
एकंदरीत १२ ऑक्टोबरला बनणारा हा गजकेसरी योग तीन राशींच्या लोकांसाठी जणू नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती व आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल होण्याची चिन्हे आहेत. ज्योतिषांच्या भाषेत सांगायचं झालं, तर गुरू-चंद्राचा हा संगम भाग्य उजळवणारा आणि संकट दूर करणारा ठरणार आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)