July Numerology : २०२५ चा सातवा महिना जुलै सुरू झाला आहे. या महिन्यात सूर्य, शनि आणि गुरू राशींवर कृपा दाखवणार आहे. तर काही मूलांकसाठी हा महिना फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊ या, अंकशास्त्रानुसार या सातव्या महिन्यात कोणत्या अंकाना विशेष महत्त्व दिले आहे.
७ या अंकाचा संबंध केतु ग्रहाशी आहे. अशात जुलै महिन्यात मूलांकवर केतुचा प्रभाव दिसून येईल. तसेच काही लोकांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. यांना करिअर, गुंतवणूक आणि नात्यामध्ये शुभ वार्ता मिळू शकते. तसेच दीर्घकाळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. जाणून घेऊ या लकी मूलांकविषयी.
मूलांक १
मूलांक १ साठी जुलै महिना अत्यंत खास असणार आहे. जर कोणतेही काम सुरू करत असाल, तर सर्वांची साथ मिळेन. या लोकांना महिन्याच्या सुरुवातीला वेळ, धन आणि ऊर्जामध्ये संतुलन ठेवावे लागेल. जर हे लोक प्रवासात जात असेल, तर कोणाला तरी बरोबर न्यावे. गुंतवणूकीतून लाभ मिळू शकतो. व्यवसाय सामान्य राहीन. नात्यात गोडवा राहीन. विवाह योग्य लोकांसाठी प्रेमाचा प्रस्ताव येऊ शकतो.
शुभ अंक – ८
शुभ रंग – पिवळा (लिंबू)
मूलांक २
मूलांक २ लोकांना आर्थिक प्रकरणामध्ये लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे. कार्याविषयी या लोकांचा आत्मविश्वास दिसून येईल. संवादाला प्राधान्य द्यावे. व्यापारासाठी जर हे लोक कोणत्याही राज्यामध्ये प्रवास करत असेल तर यांना यश मिळू शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवीन अपडेट मिळू शकतात. या महिन्याच्या मध्ये वाहन खरेदीचा विचार करू शकतात.
शुभ अंक – १३
शुभ रंग – निळा
मूलांक ४
मूलांक ४ असलेले लोक अतिशय सकारात्मक राहीन. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना काही अडचणी येऊ शकतात. जुलै महिन्याच्या शेवटी सर्व काही नीट होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेन, ज्यामुळे मनाप्रमाणे हे लोक काम करू शकतील. या लोकांचे प्रेम संबंध आणखी दृढ होईल. कार्य स्थळी या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. पगारात वाढ होत असेल तर भौतिक सुख वाढू शकते. गुंतवणूकीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. करिअरच्या दृष्टीकोनातून ही वेळ शुभ राहीन.
शुभ अंक – १५
शुभ रंग – हिरवा
मूलांक ७
मूलांक ७ असलेल्या लोकांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात आणि समाजात दोन्ही ठिकाणी मान प्रतिष्ठा वाढणार. या लोकांनी घाई करू नये. नात्यामध्ये मतभेद असतील तर ते दूर होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल. प्रेम संबंधामध्ये गोडवा दिसून येईल. न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती होईल.
शुभ अंक – ७
शुभ रंग – गुलाबी