Guru Vakri 2024 Kark Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी वर्की आणि मार्गी होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०१ मिनिटापासून वृषभ राशीत गुरु वक्री होईल आणि पुढील वर्षी ५ फेब्रुवारीपर्यंत या अवस्थेत वृषभ राशीत भ्रमण करत राहील. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या लोकांना मान-सन्मान आणि पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मिथुन राशी

गुरु वक्री होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून १२व्या घरात गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट प्रोजेक्ट मिळतील आणि हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवणारा मानला जातो. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील आणि तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळतील. यावेळी तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. या काळात तुमच्या मन:कामना पूर्ण होतील. तसेच, यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

हेही वाचा – शुक्राच्या नक्षत्रात सूर्य करणार प्रवेश! ‘या’ राशींचे भाग्य पलटणार, आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळणार

कर्क राशी

गुरू वक्री होणे तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानात गुरू ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुम्हाला व्यवसायातही अनेक पटींनी फायदे मिळतील. तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच राजकारणाशी संबंधित अस लेल्यांना काही पद मिळू शकते.

हेही वाचा –१३ सप्टेंबरपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीब? सूर्यदेवाची शक्ती वाढताच लक्ष्मी कुणाच्या दारी येणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक राशी

गुरू वक्री होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या सातव्या घरात गुरु ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी अद्भूत असेल. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या संधीही मिळतील. व्यवसायात भरपूर नफा होईल आणि जसजशी तुमची बौद्धिक क्षमता वाढेल तसतशी तुमची प्रगती होईल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.