Guru Uday 2024: ज्योतिष शास्त्रात ग्रहांना अत्यंत मानाचं स्थान दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय होतात आणि मावळतात आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत. गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा ३ जूनला वृषभ राशीत उदय होणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरू ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल.

जूनपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु?

मेष राशी

देवगुरुच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरु शकतो. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नोकरीत इच्छित बदली होऊ शकते. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे मिळू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीसाठी अनेक नवीन मार्ग सापडू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. 

(हे ही वाचा : शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना गुरूच्या उदयामुळे बरेच फायदे मिळू शकतात. ज्या कामाची तुम्ही गेले अनेक महिने वाट पाहात होतात ते काम देखील मार्गी लागू शकतात. तुमची जी काही बिघडलेली कामे आहेत ती सुरळीत पार पडताना दिसू शकतात. तुम्हाला प्रमोशन, तसेच तुमच्या इच्छेनुसार नोकरीत बदली मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. अचानक तुम्हाला पैसे मिळू शकतात. अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढू शकते.

कन्या राशी

बृहस्पतिच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. जीवनातील सर्व अडथळे आता दूर होऊ शकतात. परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला मुलांकडून आंनदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)