Dhanteras Jupiter Transit 2025: दिवाळीचा काळ म्हणजे संपन्नता, शुभत्व आणि समृद्धीचं प्रतीक. या पर्वात प्रत्येक जण देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी प्रार्थना करतो. मात्र, यंदाच्या धनत्रयोदशीच्या रात्री एक दुर्मीळ आणि अत्यंत शुभ ग्रहयोग घडणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतंय. कारण गुरु ग्रह बृहस्पति, ज्यांना धन, ज्ञान आणि आस्थेचे स्वामी मानलं जातं, ते या रात्री कर्क राशीत गोचर करणार आहेत आणि हीच त्यांची उच्च रास मानली जाते. या घटनेमुळे काही राशींना विशेष लाभ होऊ शकतो, असं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण सूचित करतं. या काळात गुरुच्या उच्च गोचरामुळे धनवृद्धी, स्थैर्य आणि सुखसमृद्धीचे संकेत मिळत आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या ५ राशींवर या ग्रहयोगाचा सर्वाधिक शुभ परिणाम दिसू शकतो.

देवगुरु राशीबदल करताच ‘या’ ५ राशींच्या जीवनात येणार सुखाचे दिवस?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. बराच काळ अडकलेले पैसे मिळू शकतात. प्रॉपर्टी डील किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. घरात ऐश्वर्य आणि सुखसुविधा वाढण्याचे संकेत आहेत. कामकाजात स्थिरता येईल आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.

कर्क

गुरु ग्रहाचा गोचर कर्क राशीतच होत असल्याने ही रास केंद्रस्थानी आहे. मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्य वाढण्याची शक्यता दिसते. जुने अडथळे दूर होतील, नवे मार्ग खुलतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नातेसंबंधात गोडवा येईल.

कन्या

या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल आणि मानसिक शांती मिळेल.

धनू

धनू राशीचे स्वामी स्वतः गुरू ग्रह असल्याने, त्यांचा उच्च गोचर या राशीसाठी दुप्पट शुभ ठरू शकतो. शिक्षण, प्रवास आणि परदेशातून लाभाचे संकेत आहेत. घरात शुभकार्याची शक्यता आणि संतानापासून समाधान मिळू शकतं.

मीन

मीन राशीसाठीही हा काळ खास आहे. गुरुचा प्रभाव धनवृद्धी आणि मानसिक समाधान देऊ शकतो. प्रॉपर्टी, वाहन किंवा जमीन यांमधून फायदा होण्याचे योग आहेत. जुने त्रास दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल.

ज्योतिषशास्त्र सांगतं की, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या या काळात गुरुचा उच्च गोचर हे शुभ, संपन्न आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. मात्र, प्रत्येक राशीवर याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो, म्हणूनच या काळात सद्गुण, दान आणि सकारात्मक विचार ठेवणं सर्वात अधिक लाभदायक ठरेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)