scorecardresearch

गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? गुरुकृपेने २०२३ च्या ‘या’ महिन्यात प्रचंड धनलाभाची संधी

Jupiter Transit: सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांना या राजयोगाने प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

Jupiter Transit Will Create Gajlakshmi Rajyog Can Give These Three Zodiac Signs Huge Money And Dhanlabh Astrology
गुरुकृपेने २०२३ च्या 'या' महिन्यात अपार धनलाभाची संधी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gajlaxmi Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा देव मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह लाभदायक स्थानी असतो त्यांचे भाग्य उजळण्याची ही वेळ असते अशी मान्यता आहे.२०२३ या वर्षात गुरु ग्रह मीन राशीतुन मेष राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार २४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरु ग्रह मीन राशीत मार्गी झाले होते. तर आता येत्या वर्षात २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह राशी परिवर्तन करून मेष राशीत परिवर्तन करणार आहेत. मेष राशीत गुरु ग्रहाने प्रवेश घेताच गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांना या राजयोगाने प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत?

मेष (Aries Zodiac)

गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींना आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या राशीत गुरु लग्नभावात स्थिर होणार आहे. हे स्थान संतती प्राप्तीचे तसेच व्यवसाय वृद्धीचे मानले जाते. येत्या काळात गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींना नवीन नोकरीच्या संधी व प्रचंड पगारवाढ मिळू शकते. कोर्टाच्या खटल्यांमध्येही आपल्याला हवे तसे यश मिळू शकते.

धनु (Dhanu Zodiac)

गजलक्ष्मी राजयोगाने धनु राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. गुरु ग्रह हा आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. येत्या काळात धनु राशीच्या मंडळींना परदेशवारीचे योग आहेत. येत्या काळात आपल्याला मित्रांच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे नातेसंबंध सुधारण्यास येणारा काळ हा अत्यंत शुभ ठरू शकतो.

हे ही वाचा<< २०२३ वर्षात तुमची रास कधी होणार श्रीमंत? शनिदेव १२ राशींना ‘या’ महिन्यांमध्ये देऊ शकतात बक्कळ धनलाभ

मिथुन (Mithun Zodiac)

गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मिथुन राशीच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. आपल्या जुन्या गुंतवणूकीचा सुद्धा लाभ होऊ शकतोजर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर येत्या काळात तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो, पण पूर्ण खबरदारी घ्या.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 20:22 IST
ताज्या बातम्या