Lakshmi Narayan Rajyog and Budhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांना विशेष महत्त्व आहे. ग्रह-तारे ठराविक कालावधीनंतर विविध राशींमध्ये प्रवेश करत असतात ज्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. या राशीप्रवेशांतून वेगवेगळे राजयोग तयार होत असतात. ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुधदेव २ एप्रिल २०२४ रोजी मेष राशीमध्ये वक्री वाटचाल सुरू करेल. त्यानंतर बुधदेव ९ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल. मीन राशीमध्ये शुक्र आणि बुधदेवाच्या युतीमुळे ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल. तर दुसरीकडे सूर्य आणि बुधदेवाच्या युतीमुळे ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होणार आहे. अशा स्थितीत दोन राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. कोणत्या राशींसाठी हा योग लाभदायी ठरणार, पाहूया…

‘या’ राशींचे नशीब पालटणार?

वृषभ राशी

लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.

(हे ही वाचा: एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी)

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

मीन राशी 

लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग मीन राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरु शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)