Laxmi Pujan Read Powerful Stotram: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी आणते. या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. पण, यंदा लक्ष्मीपूजन काही ठिकाणी २० ऑक्टोबर तर काही ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी साजरे केले जाईल. दरम्यान, लक्ष्मीपूजन केल्यानंतर देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही स्तोत्रांचे पठण करणे देखील महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात, स्तोत्रांच्या पठणाने देवी लक्ष्मी घरात निरंतर वास करते.

देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे स्तोत्र

श्री सुक्त

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असणारे हे स्तोत्र महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. या सुक्ताच्या पठणाने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. संस्कृत भाषेतील हे स्तोत्र १६ वेळा तरी वाचावे.

महालक्ष्मी अष्टक

देवी लक्ष्मीला महालक्ष्मी अष्टक खूप प्रिय आहे. याचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तसेच प्रत्येक शुक्रवारी आवर्जुन पठण करावे. यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा निवास राहतो.

कनकधारा स्तोत्र

कनकधारा स्तोत्र देखील अत्यंत प्रभावी आहे, पैशांची चणचण कमी करण्यासाठी या स्तोत्राचे पठण केले जाते. हे स्तोत्र पठण केल्याने देवी लक्ष्मी, नारायणांसहीत तुमच्या घरात वास करतील.

असे करावे पठण

लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या या ३ स्तोत्रांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे १,३,५,१० किंवा १६ वेळा आवर्जुन पठण करावे. या तिन्ही स्तोत्रांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करु शकता. हे सर्व स्तोत्र खूप प्रभावी असून लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. यांच्या नियमित पठणाने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक चणचण दूर होऊन. आयुष्यातील पैशांसंबंधीत समस्या दूर होतात. शिवाय व्यक्तीला सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त होते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)