Chanakya Niti in Marathi: मौर्य वंशाचे राजकीय तज्ञ आचार्य चाणक्य हे राजकीय तज्ञ आणि नीतिशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या नीतिमध्ये नोंदवलेल्या केलेल्या गोष्टी माणसाचे जीवन सुखकर आणि यशस्वी करण्यासाठी अगदी अचूक आहेत. चाणक्याने समाजहितासाठी अनेक धोरणेही दिली आहेत. चाणक्य नीतिमध्ये नोंदवलेल्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता.

आचार्य चाणक्याचे नाव ‘विष्णुगुप्त’ होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे सरचिटणीस, गुरु आणि संस्थापक होते, त्यांनी अर्थशास्त्र, वृद्ध चाणक्य, लघु चाणक्य आणि त्यांचे नीतीशास्त्र या ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आजही बऱ्याच अंशी खऱ्या आहेत. दरम्यान चाणक्य नीतिमध्ये प्राण्यांकडून काय शिकावे याबाबत सांगितले आहे. या लेखात श्रेष्ठ आणि विद्वान व्यक्तींनी गाढवाकडून काय शिकावे याबाबत आचार्य चाणक्य काय सांगतात हे जाणून घेऊ या….

हेही वाचा –सूर्य आणि शनीची केंद्र दृष्टीमुळे ४ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! आयुष्यात आनंदी आनंद

चाणक्य नीतिमधील श्लोक

“सुष्ट्रान्तोऽपि वहेद् भारं शीतोष्णं न पश्यति।
सन्तुष्टश्चचरातो नित्यं त्रिणि शिक्षेच्च गर्दभात् ॥”

अर्थ

चाणक्यांनी या संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून गाढवाकडून तीन महत्त्वाचे गुण शिकण्याचा संदेश दिला आहे. हा श्लोक सांगतो की, गाढव कितीही थकले तरीसुद्धा ओझे वाहत असतो तो आपले काम थांबवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने आळस न करता आपल्या ध्येयप्राप्ती आणि सिद्धीसाठी नेहमी प्रयत्नशील रहावे. आपल्या कर्तव्याचा मार्ग सोडून नये. काम पूर्ण करताना ऊन, थंडीआणि वारा यांची पर्वा न करता काम करावे. गाढव ज्याप्रमाणे संतुष्ट होऊन इथे तिथे चरते त्याप्रमाणे बुद्धीमान व्यक्तीने नेहमी आनंदी राहून फळाची चिंता न करता कार्यात मग्न राहिले पाहिजे.

हेही वाचा –२०२५ मध्ये शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! ‘या’ राशींचे नशिब पटलणार, अचानक होणार मोठा धनलाभ

गाढवाकडून शिका या तीन गोष्टी

या श्लोकावर आधारित चाणक्यांनी व्यक्तीने जीवनात कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात, याचा विचार मांडला आहे.

पहिला धडा म्हणजे कठोर परिश्रम. गाढव थंडी, उन्हाळा किंवा पावसाची चिंता न करता आपले काम न थकता करत राहते. याचप्रकारे, माणसानेही जीवनातील आव्हानांचा सामना करत आपल्या ध्येयासाठी मेहनत घ्यायला हवी.

दुसरा धडा म्हणजे समाधान. गाढवाला जे काही मिळते, त्यात ते समाधानी राहते. आजच्या स्पर्धात्मक युगात समाधान आणि मानसिक शांतता यांसाठी आपल्यालाही हे तत्त्व पाळावे लागेल.

तिसरा आणि महत्त्वाचा धडा म्हणजे कर्तव्यनिष्ठा. गाढव आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कधीही मागे हटत नाही. याच प्रकारे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रात न थकता कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

हेही वाचा –ग्रहांचा सेनापती मंगळ होणार वक्री, नववर्षाच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी, तुमची रास आहे का या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाणक्यांचे हे विचार आजच्या तणावपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. गाढवाकडे फक्त प्राणी म्हणून पाहण्याऐवजी त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांचा विचार केला, तर कठोर परिश्रम, संतोष आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करता येईल.