उल्हास गुप्ते

Lucky Numbers as Per Birthdate: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. मूलांकाला जेव्हा भाग्यांकाची साथ लाभते तेव्हा जीवनातील खूप खोलवर गोष्टीचा उलगडा होत जातो. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एकांक, यास भाग्यांक असे म्हणतात. मूलांक पहाताना आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

भाग्यांक व मूलांकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्तीच्या मानसिकतेला स्पर्श केला जातो. मूलांक भाग्यांक या दोन्हीच्या आधारे तुमची शारीरिक क्षमता स्वभावातील गुणदोष विचार करण्याची पद्धती, नोकरी उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवन या बाबतीत माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच पूर्ण जन्मतारखेतील कुठल्याही एका अंकाची उपस्थिती जास्त असेल तर अंकाचे चांगले वाईट परिणाम समजू शकतात.

भाग्यांक काढतांना प्रथम संपूर्ण जन्मतारीख मांडावी उदाहरणार्थ एखाद्याची जनमतारीख १५ – ११- १९७९

जन्मदिवस १५ = १ + ५ = ६

जन्ममहिना ११ = १ + १ = २

जन्मवर्ष १९७९ = १+९+७ + ९ = २६ = ८

म्हणजे ६+२+८ = १६ = १ + ६ = ७ हा तुमचा भाग्यांक ठरतो.

हे ही वाचा<< लक्ष्मीकृपेने ऑगस्ट महिन्यात तुमचीही रास ठरेल का नशीबवान? १२ राशींचे तन- मन- धन कसे राहणार, वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मूलांक जास्तीत जास्त दोन अंकातून निर्माण होतो. तर भाग्यांक विविध अंकातून तयार होत असतो. भाग्यांकानुसार आपल्या स्वभावाचे तसेच भविष्याचेही वेध घेता येतात. आपण भाग्यांक सिरीजमधील पुढील लेखात १ ते नऊ अशा भाग्यांकांचे अर्थ व महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यासाठी लोकसत्ताचे राशी वृत्त हे पेज पाहायला विसरू नका.