Maghi Ganesh Jayanti 2024 Date Time Puja Muhurat : हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते, असा विश्वास आहे. चला तर मग जाणून घेऊया माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश जयंती २०२४ तारीख (Maghi Ganesh Jayanti 2024 Date)

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.४४ वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारीला दुपारी २.१४ वाजता संपेल. उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती १३ फेब्रुवारीला येत आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi ganesh jayanti 2024 date time shubha muhurat puja vidhi magh vinayak chaturthi moonrise timing sjr
First published on: 09-02-2024 at 17:00 IST