Dussehra Horoscope Mars and Budh Conjunction: वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक वेळेनुसार गोचर करून इतर ग्रहांशी युती करतात, ज्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-दुनियावर दिसतो. २ ऑक्टोबर, दसऱ्याच्या दिवशी, तूळ राशीत बुध आणि मंगळ यांची युती होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात, बुध हा बुद्धीचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार मानला जातो, तर मंगळ शक्ती आणि उत्साहाचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानला जातो. या दोन्ही ग्रहांची युती म्हणजे बुद्धी आणि शक्तीचा सुंदर संगम होणार आहे. यामुळे काही राशींना लाभ होऊ शकतो, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला तर मग पाहूया, कोणत्या राशींना ही युती लाभदायक ठरणार आहे…
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि मंगळ यांची युती फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या सप्तम भावावर होणार आहे. त्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील.
या काळात पार्टनरशीपच्या कामात फायदा होईल. तुमच्या धैर्य आणि ताकदेत वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि करिअरमध्येही यश मिळेल. जीवनसाथीबरोबर चांगला वेळ घालवाल. तसेच मान-प्रतिष्ठा आणि सन्मान देखील मिळेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुमच्यासाठी बुध आणि मंगळ यांची युती फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या आय आणि नफ्याच्या स्थळी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठा वाढ होऊ शकतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील उघडू शकतात.
जर तुम्ही आर्थिक बाबतीत योग्य अंदाज आणि निर्णय घेत पुढे गेलात, तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. पैसा कमावण्याच्या संधी देखील उपलब्ध होतील. व्यवसाय आणि व्यापारी क्षेत्रातही लाभ मिळण्याची चांगली शक्यता आहे. या काळात गुंतवणुकीतून फायदा होण्याचे योग आहेत.
कर्क राशी (Cancer Horoscope)
तुमच्यासाठी बुध आणि मंगळ यांची युती फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या चतुर्थ भावावर होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक बाबतीतही फायदा होईल आणि पैसा कमावण्यासाठी शुभ संधी तयार होतील. काही संपत्तीचा लाभही मिळू शकतो. वारसाहक्काची संपत्ती मिळण्याची संधी आहे. काम-व्यवसायात प्रगती होईल. आई व सासरकडील नातेवाईकांसोबत संबंध मजबूत राहतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)