ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे, मकर ही शनीची राशी असून शनी आणि मंगळ ग्रहात शत्रुत्वाचं नातं आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा क्रूर आणि आक्रमक मानला जातो. जेव्हा मंगळ शत्रू राशीत प्रवेश करतो तेव्हा देश-विदेशात बदल घडतात. युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर शनीदेव देखील मकर राशीत आधीच विराजमान आहेत. त्यामुळे या संक्रमणाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. पण चार राशी आहेत ज्यांच्या अडचणी वाढू शकतात. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

मिथुन: मंगळ तुमच्या राशीतील आठव्या स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन जपून चालवावे. या काळात तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. तसेच तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आता थांबा, कारण सध्या वेळ अनुकूल नाही. कायदेशीर वादात अडकण्याचीही शक्यता आहे.

कर्क: मंगळ तुमच्या राशीतून सातव्या स्थानात प्रवेश करत आहे. या स्थानाला वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात जोडीदारासोबत विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही समस्या असू शकतात. तसेच भागीदारीच्या कामात नुकसान होऊ शकते. तसंच आता काही भागीदारीचं काम करायचं असेल तर थांबलं तर बरे होईल.

कन्या: मंगळ तुमच्या राशीतून पाचव्या भावात गोचर करत असेल त्यामुळे यावेळी प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. काही नाती तुटण्याच्या मार्गावरही येऊ शकतात. या काळात तुम्हाला करिअरच्या आघाडीवर काही आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या राशीतून पाचव्या भावात मंगळ आणि शनिदेवाची युती होत आहे. त्यामुळे या वेळी मुलांशी संबंधित काही समस्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो.

Sun Transit 2022: ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ चार राशींचं भाग्य उजळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु: ग्रहांचा अधिपती मंगळ तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात भ्रमण करत आहे. ज्याला वाणी आणि पैशांचं स्थान म्हणतात. त्यामुळे तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. तसेच, व्यवहारात तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वाद होऊ शकतो. तुमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा.