28 July Mangal Gochar Benefits: ज्योतिष पंचांगानुसार, मंगळ ग्रह सुमारे १८ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. सध्या मंगळ १२ तासांनंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. कन्या राशीवर बुध देव यांचे राज्य आहे. म्हणजेच आता मंगळ ग्रह बुधाच्या घरात प्रवेश करणार आहेत. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना जमीन-संपत्ती आणि अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी…

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मंगळ ग्रहाचं हे राशी बदलणं तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. कारण मंगळ ग्रह तुमच्या गोचर कुंडलीनुसार सुख स्थानातून जातील. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही एखादी गाडी किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करू शकता. तसंच एखादं अडकलेलं पेमेंट मिळू शकतं किंवा नव्या पैशाचा स्रोत तयार होऊ शकतो. यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभही मिळू शकतो. कायदेशीर बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो आणि करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात. या काळात आई आणि सासरच्या लोकांशी संबंध चांगले राहतील.

सिंह राशी (Leo Horoscope)

मंगळ ग्रहाचं राशी बदलणं सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण हे परिवर्तन तुमच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगलं काम करता येईल आणि लोक तुमचं कौतुक करतील. काही महत्वाच्या व्यक्तींशी भेट होऊ शकते. या काळात मंगळ ग्रह तुमचं बोलणं अधिक प्रभावी बनवेल, त्यामुळे तुम्ही समाजात आणि व्यवसायात छाप पाडू शकाल. सिंह राशीचे लोक या वेळी आपल्या कल्पकतेचा आणि बुद्धीचा वापर करून नवीन संधी मिळवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

तुमच्यासाठी मंगळ ग्रहाचा गोचर शुभ फल देणारा ठरू शकतो. कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभ स्थानात प्रवास करणार आहेत. शिवाय, मंगळ ग्रह तुमच्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. नव्या उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. यासोबतच मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो, ते एखादी मोठी डील करू शकतात ज्याचा पुढे चांगला फायदा होईल.