Mangal Ketu Kujketu Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांशी युती करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. त्यात ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करील, जिथे केतू आधीच भ्रमण करीत आहे. त्यामुळे सिंह राशीत मंगळ आणि केतूच्या युतीमुळे कुजकेतू योग निर्माण होईल. कुजकेतू योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. त्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल नोकरीत त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पण, कोणत्या राशींच्या लोकांना हा फायदा होईल ते जाणून घेऊ…
मिथुन
केतू आणि मंगळाची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुमचे काम किंवा व्यवसाय एक्स्पोर्ट-इम्पोर्टशी किंवा परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात.
वृश्चिक
केतू आणि मंगळाची युती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायानिमित्त तुम्ही खूप प्रवास करू शकता. करिअरशी संबंधित नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम कराल आणि त्यातून तुमचा एक नवीन यशस्वी प्रोजेक्ट तयार होईल किंवा भागीदारी सुरू होऊ शकते, जी भविष्यात फलदायी ठरू शकते. त्याच वेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
तूळ
केतू आणि मंगळाचा संयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. नोकरी बदलण्याचा किंवा उच्च पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही अनुकूल परिस्थिती असेल. एखादा प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा नवीन गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.