Budh Transit 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करीत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध ग्रह बुद्धी, धन, व्यापार व संवाद यांवर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज ७ मे २०२५ रोजी पहाटे ४:१३ वाजता बुध ग्रहाने मंगळाच्या मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधाचे गोचर हे चार राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. त्यांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत, ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींचे अच्छे दिन सुरू?

कर्क

बुध ग्रहाचा राशिबदल कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. त्यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला सहकार्य करू शकतात.

कन्या

बुधाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारे ठरू शकते. या राशीच्या लोकांना व्यापारात बक्कळ नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीची चिन्हे आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे गोचर आनंद घेऊन येणारे ठरू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मीडिया, कम्युनिकेशन व मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो. जे नोकरी शोधत आहेत, त्यांना नव्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

धनू

बुधाचे गोचर धनू राशीच्या मंडळीसाठी शुभ ठरू शकते. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगती होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)