Akshaya Tritiya 2025 Shubh Yog: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून यंदाची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातोय. या वर्षी अक्षय्य तृतीया बुधवार, ३० एप्रिल रोजी आहे. ज्योतिषांच्या मते, यावेळी २४ वर्षांनी ‘अक्षय योग’ निर्माण होत आहे. याआधी हा योग २००१ मध्ये आला होता. अक्षय योग हा एक अतिशय दुर्मिळ पण अतिशय शुभ आणि फलदायी योग आहे. असे मानले जाते की जेव्हा हे योग तयार होते तेव्हा ते जीवनात कायमचे सुख, समृद्धी आणि यश आणते. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला गुरु आणि चंद्राच्या युतीने हा शुभ योग घडून येतोय. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या सुख समृद्धीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
‘या’ राशींचे नशीब चमकणार!
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेला घडून येणारा शुभ योग अतिशय लाभदायी ठरु शकतो. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचीआर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
कर्क
माता लक्ष्मीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
अक्षय्य तृतीयेला घडून येणारा शुभ योग कन्या राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकतो. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
धनू
धनू राशीच्या मंडळींना माता लक्ष्मीच्या कृपेने फलदायी परिणाम मिळू शकतात. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे. यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.
मीन
माता लक्ष्मीच्या कृपेने मीन राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)