Mata Lakshmi Favourite Date Of Birth: हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, वैभव आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या आयुष्यात धन संपत्ती आणि सुख समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. याच कारणाने प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा, उपवास आणि दान करतात. पण तुम्हाला माहितीये का काही लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते.
अंकशास्त्रानुसार काही खास तारखांना जन्मलेले लोकांवर धन संपत्तीची देवी लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते. जर तुमचा जन्म त्या तारखांना झाला असेल तर तुम्ही खूप नशीबवान ठरू शकता. तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा असू शकते. जाणून घेऊ या ते कोणते लोक आहेत, ज्यांच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते.
मूलांक काय असतो?
अंक ज्योतिषशास्त्रानुसार मूलांकचा अर्थ होतो आपली जन्मतारखेची बेरीज. जर व्यक्तीची जन्मतारीख २४ असेल तर त्याचा मूलांक ६ असतो. कारण २+४ = ६. तसेच १५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक सुद्धा ६ असतो. १+५ = ६. मूलांकवरून व्यक्तीचे नशीब आणि जीवनात येणाऱ्या घटनांविषयी माहिती जाणून घेता येते. या मूलांक ६ ला माता लक्ष्मीची अंक म्हणतात.
मूलांक ६ वर असते नेहमी माता लक्ष्मीची कृपा
अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. ज्या लोकांची जन्मतारीख ६, १५, आणि २४ असेल त्यांच्यावर शुक्र ग्रहाची आणि लक्ष्मीची विशेष कृपा असते. शुक्र ग्रहाला भौतिक सुख सुविधा, ऐश्वर्य, प्रेम आणि सुंदरतेचे कारक मानले जाते. हेच कारण आहे की ज्या लोकांना मूलांक ६ असतो, त्यांना जीवनात धन संपत्ती, सुख सुविधा आणि लक्झरी वस्तू मिळतात. माता लक्ष्मीचा थेट संबंध धन आणि ऐश्वर्याशी असतो. त्यामुळे मूलांक ६ असलेले लोक माता लक्ष्मीला विशेष प्रिय असतात. या लोकांना कधीही आयुष्यात धन संपत्तीची कमतरता भासत नाही. हे लोक राजाप्रमाणे आयुष्य जगतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)