Nirjala Ekadashi 2023 आज वर्षातील सर्वात मोठी निर्जला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसंपत्ती मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक निर्जला एकादशीचे व्रत ठेवतात. धनसंपत्तीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाने नुकतेच कर्क राशीत गोचर केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीला ग्रहांच्या हालचालीमुळे पाच राशींवर सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची या राशींवर विशेष कृपा राहणार, असे मानले जाते. आज आपण या राशींविषयी जाणून घेऊ या.
मेष – ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी निर्जला एकादशी लाभदायक ठरणार आहे. या राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते, असे मानले जात आहे.
कर्क – निर्जला एकादशीनंतर कर्क राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. या कर्क राशींच्या लोकांची कमाईसुद्धा वाढू शकते, असे मानले जात आहे.
तूळ – निर्जला एकादशीपासून तूळ राशींच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल, असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा फायदा होणार आणि त्यांना धनलाभ होऊ शकतो, असे मानले जात आहे.
हेही वाचा : ६ मार्च २०२३ पासून ‘या’ पाच राशींना होणार बक्कळ धनलाभ? शनीचा मूळ राशीत उदय देऊ शकतो अपार श्रीमंती
वृश्चिक – ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांची जास्तीत जास्त कामे मार्गी लागतील आणि यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे आणि निर्जला एकादशीनंतर या राशीच्या लोकांकडे पैसा येणार, असे मानले जात आहे.
मीन – मीन राशीच्या लोकांच्या कमाईमध्ये वाढ होणार, जबाबदारी वाढू शकते आणि प्रमोशन मिळू शकते, असे मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीपासून या राशीचा उत्तम काळ सुरू होणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirjala ekadashi 2023 these five zodiac signs will get more money astrology horoscope ndj