Nirjala Ekadashi Vishesh Horoscope Today In Marathi, 6 June 2025 : ६ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी शनिवारी सकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी १० वाजून १३ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग जुळून येईल. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज निर्जला एकादशी असणार आहे. निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे. तर निर्जला एकादशी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घेऊया…

आजचे राशिभविष्य ६ जून २०२५ ( Dainik Rashi Bhavishya In Marathi, 6 June 2025 )

दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi)

अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi )

सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope In Marathi)

भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्‍यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope In Marathi)

काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope In Marathi)

अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.

दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope In Marathi)

मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.

दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope In Marathi)

प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope In Marathi)

बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope In Marathi)

पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर