Dainik Rashibhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Daily horoscope live updates in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह ११ मे २०२५

17:45 (IST) 11 May 2025

मीन दैनिक राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

17:45 (IST) 11 May 2025

कुंभ दैनिक राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.

17:45 (IST) 11 May 2025

मकर दैनिक राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

17:44 (IST) 11 May 2025

धनू दैनिक राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.

17:37 (IST) 11 May 2025

वृश्चिक दैनिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.

17:37 (IST) 11 May 2025

तूळ दैनिक राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. जुगारापासून दूर राहावे. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

17:37 (IST) 11 May 2025

कन्या दैनिक राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.

17:37 (IST) 11 May 2025

सिंह दैनिक राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.

17:37 (IST) 11 May 2025

कर्क दैनिक राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

17:36 (IST) 11 May 2025

मिथुन दैनिक राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

16:45 (IST) 11 May 2025

वृषभ दैनिक राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.

16:40 (IST) 11 May 2025

मेष दैनिक राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.

13:01 (IST) 11 May 2025

१२ महिन्यांनंतर शुक्राचा शक्तिशाली मालव्य राजयोग; जूनपासून 'या' राशींचा सुरू होणार सुर्वणकाळ; नोकरी, व्यवसायात होईल मोठी कमाई

Malavya Rajyog 2025 : शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे तीन राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. ...अधिक वाचा
11:59 (IST) 11 May 2025

Weekly Horoscope 12 To 18 May 2025: या आठवडयात ७ राशींना पदोन्नतीसह मिळणार पगारवाढ, कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope in Marathi मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीची साप्ताहिक राशीभविष्य… ...अधिक वाचा
10:45 (IST) 11 May 2025

पैसा, प्रेम अन् प्रसिद्धीचे सुख! बुद्ध पौर्णिमेपासून 'या' पाच राशींचे आयुष्य एका क्षणात बदलणार; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन करणार प्रत्येक मनोकामना पूर्ण

Surya Nakshatra Parivartan 2025 : पंचांगानुसार, ११ मे २०२५ रोजी सूर्य कृतिका नक्षत्रामध्ये प्रवेश करील. ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. ...सविस्तर बातमी
09:37 (IST) 11 May 2025

Shani Vakra Drishti 2025 : १५ मेपासून चमकणार या राशींच्या लोकांचे नशीब; शनीच्या वक्र दृष्टीने मिळणार बक्कळ पैसा अन् सुख

Shani Vakra Drishti 2025 : शनीची सूर्यावर वक्री दृष्टी पडताच काही राशींच्या लोकांना त्याचा भरपूर फायदा मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
09:13 (IST) 11 May 2025

बुद्ध पौर्णिमेला निर्माण होत आहेत हे दुर्लभ संयोग, 'या' तीन राशींचे बदलू शकते नशीब, अचानक होईल धनलाभ

Buddha Purnima 2025 : हिंदू पंचागनुसार, या वर्षी बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या वेळी बुद्ध पौर्णिमा अत्यंत खास असणार आहे. ...वाचा सविस्तर
08:44 (IST) 11 May 2025

गुरू आणि चंद्राने निर्माण केला नवपंचम राजयोग! या ३ राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार, करिअर-व्यवसायामध्ये होणार प्रगती

शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असल्याने मालव्य योग देखील तयार होतो. अशा परिस्थितीत, या शुभ योगांच्या निर्मितीमुळे, काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. ...वाचा सविस्तर
07:34 (IST) 11 May 2025

Horoscope Today: नृसिंह जयंतीला कोणाचे नशीब उजळणार? १२ राशींना कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य

Daily Horoscope in Marathi, 11 May 2025 : आज भगवान नृसिंह तुम्हाला कसा देणार आशीर्वाद जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

Rashi Bhavishya live in Marathi

Rashi Bhavishya live in Marathi