These Numerology Live Their Life Like A King : ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची रास असते, त्याचप्रमाणे प्रत्येक अंकानुसार अंकज्योतिषशास्त्रात एक मूलांक ठरलेला असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो आणि व्यक्तीचा स्वभाव, तिच्या भविष्याबद्दल अंदाज लावता येतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की, मूलांक म्हणजे काय आणि तो कसा काढला जातो. तर हा मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. म्हणजेच जर तुमची जन्मतारीख २४ असेल तर २ + ४ = ६ म्हणजेच तुमचा मूलांक ६ आहे.

अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म क्रमांकाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, नशिबावर आणि जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. काही जन्मतारखा जन्मापासूनच संपत्ती, प्रतिष्ठा, राजेशाही प्रदान करतात असे मानले जाते. तर आज आपण राजेशाही जीवन जगणाऱ्या आणि पैशांची कधीच कमतरता भासत नाही अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत. असे लोक जिथे जातात तिथे स्वतःची वेगळी छाप सोडतात. त्यांच्याकडे संपत्ती, प्रसिद्धी, सुखसोयी असतात, जणू काही नशिबाने त्यांना विशेष ओळख देण्यासाठीच निवडले आहे.

अंकशास्त्रानुसार, ६ मूलांक असणारे लोक कला, संगीत, फॅशन, डिझाइन आणि इतर सर्जनशील क्षेत्रांमध्ये खूप रस असतो. ज्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. शुक्र हा सौंदर्य, कला, प्रेम आणि भौतिक सुखसोयींचा ग्रह आहे. म्हणूनच या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या, सर्जनशील आणि स्टायलिश देखील असतात. या अंकाचे लोक राजेशाही जीवनशैलीचा देखील आनंद घेतात. महागडे कपडे, आलिशान घरे, आलिशान कार आणि ब्रँडेड वस्तू त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग असतो. फक्त दिसायलाच नाही तर त्यांच्या जीवनशैलीतही राजेशाही झलक दिसते.