रत्न विज्ञानानुसार अंकांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याचबरोबर एखादा अंक आपल्यासाठी लकी असतो तर एखादा अनलकी. या लेखात आपण मूलांक २ विषयी बोलणार आहोत. रत्नशास्त्रामध्ये चंद्राला मूलांक २ चा स्वामी मानले जाते. ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २० आणि २९ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक २ असतो. मूलांक २ असणाऱ्या व्यक्ती या अतिशय भावुक, मधुरभाषी, कल्पनाशील आणि मृदु मनाचे असतात. ज्याप्रकारे चंद्राचा स्वभाव चंचल मानला जातो त्याचप्रकारे या व्यक्तींच्या मनाची स्थिती कधीही एकसारखी नसते. मूलांक २ असणाऱ्या व्यक्ती शरीराने दुर्बल असल्या तरीही त्या मानाने अतिशय खंबीर असतात. जाणून घेऊया मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींबद्दल काही खास गोष्टी.

फारच रोमँटिक आणि बौद्धिक असतात या व्यक्ती

मूलांक २ असणाऱ्या व्यक्ती मनाने श्रीमंत असतात आणि ते बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात. या व्यक्तींचा स्वभाव मृदुभाषी, कल्पनाशील, शांत आणि कोमल असतो. यांचे बुद्धीचातुर्य चांगले असल्याकारणाने हे लोक इतरांपेक्षा अधिक सन्मान प्राप्त करतात आणि लोकप्रिय होतात. तसेच मूलांक २ असणाऱ्या व्यक्ती अतिशय रोमँटिक आणि बुद्धीजीवी असतात.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

इतरांच्या भावनांचा करतात आदर

अगदी लहानशा गोष्टी देखील या व्यक्तींच्या मनाला लागतात. यांना नाचण्या-गाण्याची तसेच सजावटीची विशेष आवड असते. यांच्याकडे कोणतीही व्यक्ती अगदी सहज आकर्षित होऊ शकते. काही वेळातच या व्यक्ती कोणालाही आपले मित्र बनवू शकतात. दुसऱ्याचे मन ओळखण्याची खास कला यांना अवगत असते. तसेच दुसऱ्यांच्या भावनांचा हे लोक खूप आदर करतात.

या व्यक्तींवर असते चंद्रदेवाची विशेष कृपा

मूलांक २ असणाऱ्या व्यक्ती कोणालाही ‘नाही’ बोलू शकत नाहीत. प्रेमात आणि सौंदर्यात ते अतिशय पारंगत असतात. या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळतो. यांचे मन अस्थिर असते. परंतु या व्यक्तींवर चंद्रदेवाची विशेष कृपा असल्याने यांची सर्व कामे चंद्रदेवाचा आशीर्वादाने पार पडतात.

मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जीवनात भरपूर सुख-समृद्धी आणि यश प्राप्त करण्यासाठी महादेवाची पूजा केल्यास त्यांच्यासाठी ही पूजा अत्यंत फलदायी ठरेल. महादेवाने चंद्राला आपल्या मस्तकावर स्थान दिले असल्याने या दोघांमध्ये एक अलौकिक संबंध आहे. त्यामुळे या लोकांनी दररोज शिवलिंगाला जल अर्पण करावे.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)