Personality Traits According To Numerology : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही तर व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या जीवनात आणि येणाऱ्या अनेक समस्यांपासून संरक्षण करतात. त्याच बरोबर याच संख्येच्या आधारे, व्यक्तीच्या स्वभावाचे, सवयींचे, विचारांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे सखोल विश्लेषण केले जाऊ शकते. कारण – प्रत्येक संख्येचा स्वतःचा एक वेगळा प्रभाव असतो. काही जण नम्र, काही भावनिक तर अनेक जण अत्यंत आत्मविश्वासू आणि स्वतंत्र असतात. तर अंकशास्त्रानुसार, आज आपण स्वातंत्र्याचे प्रतीक, इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या निर्णयांवर जास्त विश्वास ठेवणाऱ्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत…

स्पष्टवक्त्या असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली

कधीकधी स्वावलंबी आणि स्पष्टवक्त्या असणाऱ्या मुलींना काही जण ‘अहंकारी’ म्हणतात. पण, प्रत्यक्षात, त्या फक्त आत्मविश्वासू, स्वाभिमानी, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. चला जाणून घेऊया कोणत्या जन्मांकांना सर्वात वेगळे का मानले जाते आणि इतर गोष्टी बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका काय असतो?

मूलांक १ (जन्मतारखा – १, १०, १९, २८)

मूलांक १ असणाऱ्या मुलींमध्ये जन्मापासूनच नेतृत्वगुण असतात. त्यांच्यामध्ये भरपूर आत्मवविश्वास असतो, त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्राधान्य देतात आणि कोणत्याही गोष्टीत विनाकारण हस्तक्षेप केलेला त्यांना अजिबात सहन होत नाही. स्वतःच्या मेहनतीवर, क्षमतेवर विश्वास ठेवणे हे त्यांचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य आहे. त्यांचा स्वभाव स्वावलंबी असतो. म्हणूनच लोक त्यांना “अहंकारी” किंवा “अभिमानी” समजतात. पण, खरं सांगायचे तर त्या फक्त स्वतःच्या अटींवर जीवन जगणे पसंत करतात.

अंक ८ (जन्मतारखा – ८, १७, २६)

मूलांक ८ अंक असलेल्या मुली गूढ, गंभीर आणि खोल विचार करणाऱ्या असतात. त्या सर्वकाही काळजीपूर्वक करतात आणि इतरांमध्ये सहज मिसळत नाहीत. त्यांचे संवाद खोल असतात. पण, याचबरोबर त्यांना स्वतःच्या जगात रमून जायला आवडते. त्यांचा स्वभाव संयमी, शिस्तबद्ध असतो आणि दिखाऊपणा टाळणे आवडते. कारण – त्या त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत. त्यामुळेच लोक त्यांना “अहंकारी” म्हणतात.

मूलांक ४ (जन्मतारीख – ४, १३, २२, ३१)

मूलांक ४ च्या मुलींमध्ये एक अनोखी विचारसरणी आणि क्रिएटिव्ह माईंड असते. त्या गर्दीत सामील होण्याऐवजी स्वतःचा मार्ग निवडतात, स्वतःच्या कल्पना, तत्त्वांनुसार जगणे पसंत करतात. त्या खूप कमी लोकांशी नाती जोडतात आणि भावना सहज व्यक्त करत नाहीत. म्हणूनच लोक त्यांना “स्वतः मधेच राहणाऱ्या” आणि “अहंकारी” म्हणताना; पण, खरं सांगायचं तर त्या फक्त स्वकेंद्रित आणि खाजगी असतात.