Numerology Predictions: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, काही मूलांक अशा असतात जे मुलींना नैसर्गिक सुंदरता आणि आकर्षण देतात. चला तर मग पाहूया असे कोणते मूलांक आहेत, ज्या मूलांकाच्या मुली सुंदर समजल्या जातात आणि मुलांच्या नशीबासाठी फायदेशीर ठरतात.
अंक ज्योतिष
अंक ज्योतिष (Numerology) ने नेहमीच व्यक्तीच्या व्यक्तिमत्व, स्वभाव, भविष्य आणि अगदी शारीरिक आकर्षणाचे रहस्य उघड केले आहे. असे मानले जाते की जन्मतारखेपासून मिळालेला मूलांक फक्त व्यक्तीच्या स्वभावाबद्दल सांगत नाही, तर त्याच्या गुणधर्मांवर आणि नशीबावरही प्रभाव टाकतो.
मूलांक ६च्या मुली
जर एखाद्या महिलेचा जन्म ६, १५ किंवा २४ तारखेला झाला असेल तर तिचा मूलांक ६ होतो. या अंकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो सौंदर्य, प्रेम आणि कलेचा ग्रह मानला जातो. त्यामुळे मूलांक ६ असलेल्या महिला नैसर्गिकरित्या खूप आकर्षक असतात.
यांच्या त्वचेत चमक आणि तजेला असतो. डोळ्यांत खोली आणि हास्यात वेगळंच आकर्षण असतं. या मूलांकाच्या मुली फॅशनेबल असतात आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने कोणालाही भुरळ घालू शकतात. अशा मुली भाग्यवान मानल्या जातात आणि आपल्या जीवनसाथीसाठी सौभाग्य घेऊन येतात.
मूलांक १च्या मुली
अंकज्योतिषानुसार, ज्या महिलांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला होतो त्यांचा मूलांक १ येतो. या अंकाचे स्वामी सूर्य देव आहेत, जे शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जातात. मूलांक १ असलेल्या मुली आत्मविश्वासाने भरलेल्या असतात.
बदल घडवून आणण्याची क्षमता
यांच्या चेहऱ्यावर एक खास तेज आणि प्रभाव दिसतो. या जिथेही जातात तिथे आपल्या ठाम उपस्थितीने सगळ्यांवर छाप पाडतात. यांची खासियत म्हणजे या इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद ठेवतात.
मूलांक ३च्या मुली
ज्यांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ३ होतो. या अंकाचा स्वामी गुरू ग्रह आहे, जो ज्ञान आणि धर्माचा प्रतीक आहे. मूलांक ३ असलेल्या मुली जन्मतःच खूप सुंदर असतात. या कोमल स्वभाव आणि मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे सगळ्यांचे मन जिंकतात. त्यांना भाग्यवान जीवनसाथी मानले जाते, कारण लग्नानंतर त्या आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात सौभाग्य घेऊन येतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)