Numerology Predictions: वैदिक ज्योतिषात शुक्र ग्रहाला ऐश्‍वर्य, धन, सुखसोयी, प्रसिद्धी, कामुकता आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते. शुक्र ग्रहाचा संबंध ६ या अंकाशी मानला जातो.

महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. असे लोक नशिबवान असतात. हे लोक लहान वयातच पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि सन्मान मिळवतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक हलकी आणि आकर्षक स्मितरेषा असते. ते दूरदृष्टीचे आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. चला, तर मग जाणून घेऊया अंक ६ असलेल्या लोकांच्या गुणधर्मांविषयी.

आयुष्यात भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवतात

मूलांक ६ असलेल्या लोकांना ऐशोआरामी जीवन जगायला आवडतात. हे लोक पैसा खर्च करण्यात खूप पुढे असतात आणि त्यांना कंजूसपणा अजिबात आवडत नाही. हे स्वतःला नेहमी तरुण समजतात आणि स्वतःला नीटनेटके ठेवतात. ते कलाप्रेमी असतात आणि सौंदर्याबद्दल त्यांना आकर्षण असते. त्यांच्या स्वभावामुळे हे लोक ओळखले जातात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांचा स्वभाव थोडा खोडकर असतो. तसेच ते जिथे जातात तिथे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची त्यांना आवड असते.

आकर्षक व्यक्तिमत्व

मूलांक ६ असलेले लोक पैसा कमावण्यात हुशार असतात. त्यांचा कपडे घालण्याचा सेन्स खूप छान असतो. हे लोक खूप फॅशनेबल असतात आणि त्यांना फॅशनची चांगली समज असते. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक आकर्षक दिसतात. त्यांना संगीताची आवड असते. तसेच हे लोक चतुर आणि बोलक्या स्वभावाचे असतात.

रोमँटिक आणि फॅशनेबल

हे लोक आपले छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. ते खूप प्रेमळ स्वभावाचे असतात आणि आयुष्यात अनेकदा प्रेमात पडतात. हे कोणालाही सहज सांगतात की त्यांना आवडतात. हे लोक खूप स्टायलिश असतात. मूलांक ६ असलेल्या लोकांची जुळवाजुळव मूलांक ७ असलेल्या लोकांशी सर्वात चांगली होते. तसेच मूलांक ५ असलेल्या लोकांशीही त्यांचे संबंध चांगले राहतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)