Venus Transist 2022: उरले फक्त काही तास! ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा

शुक्राच्या राशीतील बदलामुळे प्रेम, पैसा, सुखसोयींवर परिणाम होतो. ७ ऑगस्ट रोजी कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण ५ राशीच्या लोकांसाठी या बाबींमध्ये विलक्षण असेल.

Venus Transist 2022: उरले फक्त काही तास! ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा
'या' पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा(फोटो: संग्रहित फोटो)

Venus Transist 2022: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, प्रणय, सुख-सुविधा, वैभव, वैवाहिक सुख, सौंदर्य, कला यांचा कारक मानण्यात आला आहे. कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर व्यक्ती विलासी जीवनाचा आनंद घेते. दुसरीकडे, शुक्राचे संक्रमण किंवा त्याच्या स्थितीतील कोणताही बदल सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. पुन्हा एकदा शुक्र ग्रह राशी बदलणार आहे. ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ५ वाजता शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर तो ३१ ऑगस्टपर्यंत कर्क राशीत राहील आणि नंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत या ५ राशीच्या लोकांसाठी काळ खूप चांगला राहील.

मेष राशी

शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. ते त्यांच्या कारकिर्दीत मोठा फायदा मिळवू शकतात. पदोन्नती मिळण्याची, पगारवाढीची पूर्ण शक्यता आहे. याशिवाय तुमच्या कामाची स्तुती तुमचा उत्साह द्विगुणित करेल.

( हे ही वाचा: Surya Gochar 2022: १७ ऑगस्टपर्यंत या तीन राशींना मिळेल नशीबाची साथ; सूर्यदेवाच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस)

वृषभ राशी

शुक्राचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना मोठी भेट देऊ शकते. त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. त्याच वेळी, जे नोकरी बदलत नाहीत, त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचे काम वाढेल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मिथुन राशी

शुक्राच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना चांगला फायदा होईल. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. जोडीदार मिळू शकेल. विवाह निश्चित होऊ शकतो. कामाचे शुभ परिणाम होतील.

( हे ही वाचा: बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात ‘या’ चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल)

कन्या राशी

शुक्राच्या स्थितीतील बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक आनंद मिळतील. त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. आपण एखादी नवीन कार खरेदी करू शकता. तसच तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळण्याची संभावना आहे.

तूळ राशी

शुक्राच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये जोरदार प्रगती होईल. त्याच्या कामाचे कौतुक तर होईलच पण त्या बदल्यात त्याला प्रमोशन-इन्क्रीमेंट मिळू शकेल. नवीन नोकरी मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखी राहील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी