अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्म तारखेवरून कळू शकते. १ ते ९ पर्यंत एकूण नऊ मूलांक आहेत. आता आपण ५ मूलांक असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. हे लोक भाग्याने धनी मानले जातात. ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. अगदी लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. त्यांचे काम करून घेण्यात ते तज्ञ मानले जातात. त्यांची आर्थिक स्थिती साधारणपणे चांगली आहे.

ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचे लोक भाग्यवान असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात. यासोबतच नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. त्यांना प्रत्येक विषयां विषयी जाणून घ्यायला आवडते.

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयाच्या दिवशी ‘या’ राशींचे बदलणार नशीब, होणार मालामाल
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त

या मूलांकच्या लोकांना नोकरीपेक्षा व्‍यवसायात अधिक रस असतो आणि ते लोक व्यवसायातही भरपूर नफा कमावतात. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करायला आवडते. त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ असतो. ते कोणालाही आपल्या बाजूला त्वरित आकर्षित करतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात. ते संभाषण करण्यात पटाईत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)