Rahu Shukra Rashiparivaratan : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. अशा स्थितीत एका ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी युती होते किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. सुख, समृद्धी आणि संपत्ती देणारा शुक्र ३१ मार्च रोजी दुपारी ४.३१ वाजता मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत राहु हा सावलीचा ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राची युती होणार आहे. ही युती अत्यंत शुभ मानली जाते. २३ एप्रिलपर्यंत शुक्र या स्थितीत राहणार आहे. चला जाणून घेऊया मीन राशीत राहू आणि शुक्राच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल…

वृषभ राशी
या राशीमध्ये राहू आणि शुक्राचा युती अकराव्या घरात होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नियोजित कामे पूर्ण होतील. तसेच तुमची मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळेल. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करारावर स्वाक्षरी होऊ शकते. पैशाची कमतरता पूर्ण होऊ शकते. यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल. जर आपण करिअर क्षेत्राबद्दल बोललो, तर उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊ शकतात. यातसह तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. पगारवाढ आणि बढतीचीही शक्यता आहे.

हेही वाचा – होळीपूर्वी मंगळ-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल महालक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस येणार, होणार अचानक धनलाभ

कर्क राशी
या राशीमध्ये राहू आणि शुक्र यांची युती नवव्या घरात होत आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक त्यांच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतात. याच्या मदतीने तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायात प्रगती होईल. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात.

हेही वाचा – २४ तासांनी सुरु होणार खरमास; १४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशी जगतील राजाचं आयुष्य, धनलाभासह मिळेल सूर्याची शक्ती

तुला राशी
या राशीमध्ये राहू आणि शुक्राचा युती सहाव्या घरात होत आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक त्यांच्या विरोधकांवर मात करू शकतात. शत्रूवर विजय मिळू शकतो. याचबरोबर तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. याचसह तुम्हाला नोकरीसाठी परदेशात जाण्याची किंवा प्रवासाची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन डील किंवा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याची योजना बनवू शकता. एकंदरीत, तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राची जोडी फलदायी ठरू शकते.