Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूला एक पापी ग्रह मानले जाते, जो विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो. राहूच्या स्थानातील बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर दिसून येऊ शकतो. सध्या राहू मीन राशीत स्थित आहे, जो या राशीत १८ महिने राहिल्यानंतर आता १८ मे रोजी तो राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करील. राहू शनीच्या राशीतील प्रवेशाने काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. पण, राहू कुंभ राशीत प्रवेशाने नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १८ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी राहू मीन राशीतून कुंभ राशीत गोचर करेल.

कुंभ

राहूचा राशिबदल कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांनाही यश मिळू शकते. करिअरमध्येही बरेच फायदे मिळू शकतात. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनादेखील या काळात यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. कर्जातून मुक्ती मिळू शकते. त्यासह आर्थिक परिस्थिती सुधारत असताना, उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.

कन्या

राहूचा कुंभ राशीतील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबासह तुमचा चांगला वेळ जाईल. नोकरी करणाऱ्यांनाही या काळात बरेच फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

सिंह

राहूचा राशिबदल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरीत खूप फायदे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश होऊन काही मोठी जबाबदारी सोपवू शकतो. तुम्हाला आयुष्यात आनंद अनुभवता येईल. तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद राहील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता सोडवता येतील. तसेच व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.