Rahu Gochar 2025 In Kumbh: राहू हा एक मायावी आणि छाया ग्रह मानला जातो. राहू-केतू हे मंदगतीने मार्गक्रमण करणारे ग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करीत असतात. राहू आणि केतू हे ग्रह नेहमी दीड वर्षात आपली रास बदलतात. असं म्हटलं जाते की, राहू जेव्हा जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा तेव्हा त्याच्या प्रभावामुळे सर्व बारा राशी प्रभावित होतात. राहूच्या शुभ प्रभावामुळे अनेक वेळा व्यक्ती यशाच्या आणि नवीन संधींच्या मार्गावर असते. ज्योतिषशास्त्रानुसार जर राहू कुंडलीत बलवान असेल तर त्याचे चांगले परिणाम मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार, राहूने १८ मे २०२५ रोजी शनीदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. राहू ५ डिसेंबर २०२६ पर्यंत याच राशीत राहणार आहे आणि याचा जबरदस्त परिणाम काही निवडक राशींवर होणार आहे. या राशींना या काळात अपार संपत्ती, पदोन्नती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. चला पाहूया कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी…
२०२६ पर्यंत ‘या’ राशींवर राहणार राहूचा वरदहस्त?
वृषभ (Taurus):
वृषभ राशीसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायात भरभराट करणारा ठरू शकतो. या काळात व्यवसायात मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता असून, कामकाजात यश मिळू शकते. येत्या काळात आर्थिक स्थिती लाभदायक असण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. वरिष्ठांपासून सहकार्य मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकेल.
मिथुन (Gemini):
मिथुन राशीसाठी राहूचा गोचर फायदेशीर ठरु शकतो. भाग्य अचानक साथ देऊ लागेल. पूर्वी थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. परदेशगमन, धार्मिक कार्यात सहभाग आणि आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल ठरेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
कन्या (Virgo):
कन्या राशीसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. या काळात आपल्याला सर्व अपेक्षित लाभ होऊ शकतात. व्यवसायात आपल्याला प्रचंड व अनपेक्षित लाभ होऊ शकतो. दीर्घकालीन योजना यशस्वी होऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी मोठे बदल शक्य आहेत. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊन आपल्याला कर्माचे गोड फळ मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)