Rahu Shukra Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहु ग्रह दर दीड वर्षांनी राशी परिवर्तन करतो आणि त्याचबरोबर नेहमी वक्री चाल चालतो. राहुने मागील वर्षी मीन राशीमध्ये प्रवेश केला होता. २०२४ मध्ये संपूर्ण वर्ष राहु मीन राशीमध्ये असणार आहे. त्याचबरोबर ३१ मार्चला शुक्र मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २३ एप्रिल पर्यंत शुक्र मीन राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर शुक्र गोचर करून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मीन राशीमध्ये राहु शुक्रच्या युतीने विपरीत राजयोग तयार होईल. हा विपरीत राजयोग २४ एप्रिल पर्यंत राहणार. मीन राशीमध्ये राहु शुक्रच्या युतीमुळे विपरीत राजयोग खूप दिवसानंतर तयार होणार आहे. विपरीत राजयोग शुभ मानला जातो. या राजयोगामुळे तीन राशींना पुढील १० दिवस आकस्मित धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. जाणून घ्या तीन राशी कोणत्या?

वृषभ राशी – विपरीत राजयोगामुळे पुढील दहा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल. शेअर बाजार, लॉटरीमध्ये पैसा गुंतवला तर फायदा होऊ शकतो. नातेवाईकांबरोबर नाते मजबूत होईल. या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील.

हेही वाचा : Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

मिथुन राशी – विपरीत राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. या लोकांना नोकरी व्यवसायात लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या काही लोकांना नोकरी मिळू शकते. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. या लोकांच्या योग्यतेनुसार चांगले यश मिळू शकते. नवीन घर, वाहतूक खरेदी करण्याचे योग जुळून येतील.

मीन राशी – राहु-शुक्रच्या युतीमुळे मीनमध्ये विपरीत राजयोग तयार होत आहे. मीन राशीच्या लोकांना हा विपरीत राजयोग शुभ ठरणार आहे. या लोकांचा या दिवसांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. वाढलेल्या ऊर्जेमुळे या लोकांना अनेक कामे सोपी वाटतील. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा यश मिळेल. या लोकांना धन लाभ होण्याची शक्यता आहे तसेच यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)