वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ७ ऑगस्ट रोजी विलासचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. चंद्राच्या या राशीमध्ये सूर्य आधीच विराजमान आहे. अशातच आता कर्क राशीत शुक्र आणि सूर्याची युती होत आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे ‘राजभंग राजयोग’ तयार होत आहे. हा योग १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत राहणार आहे. जेव्हा सूर्य स्वतःची राशी सिंहमध्ये प्रवेश करेल, तेव्हा हा योग काही राशींसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
राजभंग योगामुळे ‘या’ राशींचे भाग्य उघडणार?
मेष रास
शुक्र आणि सूर्य यांच्या युतीने बनलेला राजभंग योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. या योगामुळे तुम्हाला समृद्धी मिळू शकते. तसेच तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर तीर्थयात्रेला जाऊ शकता. करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
कर्क रास
कर्क राशीसाठी राजभंग योग अत्यंत अनुकूल ठरु शकतो. या काळात तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते. तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची दाट शक्यता आहे.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी राजभंग योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारण्यासह तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. नोकरदारांचे या काळात प्रमोशन होऊ शकते.
हेही वाचा – २४ तासांनंतर ‘या’ राशीं होणार मालामाल? शुक्र वक्री होताच मिळू शकतो अमाप पैसा व प्रतिष्ठा
धनु रास
शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे तयार झालेला राजभंग योग धनु राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्यासह तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. सहकारी आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळाल्याने तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. उच्च अधिकाऱ्यांची भेट होऊ शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी चांगली ठरण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
