14th October Rashi Bhavishya & Panchang : आज १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. सोमवारी सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असेल. तसेच आज सोमवारी १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गंड योग जुळून येईल. आज राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. याशिवाय सोमवारी पापंकुशा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे.या दिवशी भगवान विष्णूच्या पद्मनाभ रुपाची पूजा केली जाते.तर आज १२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार हे आपण जाणून घेऊ…
१४ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :
मेष:- आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.
वृषभ:- तब्येतीची तक्रार कमी होईल. अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.
मिथुन:- नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कर्क:- व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल. आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल.
सिंह:- कामाचा व्याप वाढता राहील. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.
कन्या:- जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
तूळ:- आपल्याच मर्जीत दिवस घालवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील. स्वच्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
वृश्चिक:- काही कामे अडकून राहू शकतात. कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा. लपवाछपवीचा मार्ग धरू नका. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल.
धनू:- घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तु खरेदी करता येतील.
मकर:- जोडीदाराच्या मताचा आदर करावा. समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात.
कुंभ:- दिवस आपल्या मनाजोगा घालवाल. कामातील प्रयत्न फळाला येतील. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.
मीन:- उतावीळपणा करून चालणार नाही. फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर